पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने आमचं सरकार पाडलं नसतं तर आघाडीचं सरकार आलं असतं आणि मराठा आरक्षणाचा प्रश्नही निकाली निघाला असता असं खळबळजनक वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. सोमवारी ते पुण्यात बोलत होते.
मला खात्री आहे की माझं सरकार जर पडलं नसतं, तर आम्ही दोघे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आम्ही एकत्रित निवडणुकीला सामोरे गेलो असतो आणि 2014 मध्ये भाजपऐवजी आमचेच सरकार आलं असत असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.(Prithviraj Chavan)
ते पुढे बोलताना म्हणाले, की राज्याचा सहकार विभाग शिस्तीसाठी प्रसिद्ध नाही. सहकारातील गैरव्यवहार चीड आणणारे असून सहकारात अमूलाग्र बदल आणि सुधारणांची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री असताना जेवढे बदल करता आले तेवढे केले.
कॉम्पिटिटर्स फाउंडेशन आणि राजीव सातव विचार मंचातर्फे साखर संचालक संजयकुमार भोसले यांना दिवंगत खासदार, संसदरत्न राजीव सातव पुरस्कार चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी त्यांनी सहकार क्षेत्रासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केला.(Maratha reservation)