सागर जगदाळे
Bhigvan News : भिगवण, (पुणे) : ग्लोबल फाऊंडेशन इंडिया (Global Foundation India) यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर (national level) देण्यात येणारा बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड (Principal Award) भिगवण येथील कला महाविदयालयांचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज ( Dr. Mahadev Walunj) यांना तर बेस्ट अकॅडेमिशियन अवॉ़र्डने प्रा. डॉ. प्रशांत चवरे (Dr. Prashant Chawre) यांना गौरविण्यात (felicitated) आले. (Bhigvan News)
शैक्षणिक वर्षे २०२२-२३ च्या पुरस्काराची घोषणा व वितरण नुकतेच फलटण (जि. सातारा) येथील मुधोजी महाविदयालय येथे आयोजित आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये करण्यात आले.
ग्लोबल फाऊंडेशन इंडिया या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार..
ग्लोबल फाऊंडेशन इंडिया या संस्थेच्या वतीने देशभरामधील महाविदयालयांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्राचार्य व प्राध्यापकांचा बेस्ट प्रिन्सिपल, बेस्ट अकॅडेमिशियन व बेस्ट टिचर पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. शैक्षणिक वर्षे २०२२-२३ च्या पुरस्काराची घोषणा व वितरण नुकतेच फलटण येथील मुधोजी महाविदयालयांमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये करण्यात आले.
पुरस्कार वितरण समारंभासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीवराजे नाईक निंबाळकर, ग्लोबल इंडिया फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण सप्तर्षी, श्रीलंकेतील कलानिया विदयापीठातील डॉ. धर्मश्री लाल, गोव्याचे शिक्षण सहसंचालक डॉ. एफ.एम. नदाफ, सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाचे भुगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. ज्योतीराम मोरे, मुधोजी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच. कदम,प्रा. संतोष माने उपस्थित होते.
यावेळी भिगवण येथील कला महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज यांना बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्डने तर प्रा. डॉ. प्रशांत चवरे यांना बेस्ट अकॅडेमिशियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
याबाबत बोलताना प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज म्हणाले, ”इंदापुर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविदयालयाने आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय स्तरावरीय चर्चासत्रे, कोरोना काळांमध्ये विदयार्थी शिक्षणासाठी केलेले प्रयत्न, अभ्यासक्रम व अभ्यासक्रमा व्यतिरिक्त राबविलेले उपक्रम, संशोधन कार्य आदी बाबींची दखल घेण्यात आली याचे समाधान आहे.”
दरम्यान, प्राचार्य डॉ. वाळुंज व प्रा. चवरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल इंदापुर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, संचालक पराग जाधव तसेच महाविदयालय विकास समितीचे सदस्य रणजित भोंगळे,संपत बंडगर, सुनिल वाघ यांनी अभिनंदन केले आहे.
Bhigwan News : मदनवाडी चौफुला येथील ड्रेनेज लाईनवरील झाकणे तुटली : अपघात होण्याची शक्यता