वाघोली : वाघोली येथील नागिरकांच्या प्रश्नासंदर्भात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी घेतली पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांची भेट घेतली आहे. यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या जमिनीवरील आरक्षण रद्द करणे, नगर रोड व सोलापूर रोड हॉटेल व्यवसायिकांच्या प्रश्नांसंदर्भातही ही भेट महत्वपूर्ण होती असे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
या मुद्द्यावर झाली चर्चा..
१)हवेली येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची जमीन गट नं. १, २ व ४१ वर पीएमआरडी पुणे यांनी दि.२/८/२१ रोजी विकास आराखड्यामध्ये बस डेपो, शॉपिंग सेंटर, पार्किंग, टुरिस्ट सेन्टर, कल्चर सेन्टर, टाऊन पार्क या स्वरुपातील पीएमआरडीने टाकलेले आरक्षण रद्द करणे.
२)पुणे नगर व सोलापूर रोड येथील हॉटेल व्यवसायिकांना वाढीव बांधकामा संदर्भात ज्या नोटिसा आल्या होत्या या नोटीस रद्द करून या हॉटेल व्यवसायिकांना बांधकाम नियमित करण्यासाठी वेळ मिळावा.
३)वाघोली पाणी पुरवठा योजना मंजूर असून ५ वर्षांत पूर्ण झाली नाही या योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी, तसेच राहू रोड ते तांबेवाडी सिमेंट काँक्रिट रस्ता, वाघोली येथील बायफ रोड ते वडजाई सिमेंट काँक्रिट रस्ता करण्याबाबत तसेच रस्ते, वाघोलीतील गटार लाईन, अंतर्गत रस्ते सुधारणा करणे..
पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी वरील सर्व प्रश्न सोडवण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या आहेत. असे प्रदीप कंद यांनी माहिती दिली. यावेळी माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, यशवंत सहकारी साखर कारखाना चेअरमन सुभाष जगताप, व्हॉइस चेअरमन मोरेश्वर काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, संजय सातव, संचालक राहुल घुले, किशोर उंद्रे, मिलिंद काळभोर, पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप सातव, पुणे जिल्हा सचिव प्रदीप सातव, सचिन मचाले, मनोज जाधवराव उपस्थित होते.