Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महसूल विभागाच्या प्रश्नांबाबत महसूलमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा: आमदार राहुल कुल

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Monday, 1 July 2024, 20:14
Positive outcome in revenue department meeting about daund in mumbai says MLA Rahul Kul

यवत: दौंड तालुक्यातील महसूल विभागासंबंधित विविध प्रश्नांसंदर्भात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन, मुंबई येथे आज (दि.१) बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महसूल विभागाशी विविध प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.

दौंड तालुका नाट्यगृहासाठी आवश्यक जागेचा प्रस्ताव महसूल विभागात प्रलंबित असून सदर प्रस्ताव मंत्रिमंडळ मान्यतेसाठी सादर करण्यात यावा, तसेच अधिकारी निवासस्थाने बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत १५ दिवसांच्या आत जागा मागणीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ मान्यतेसाठी सादर करावा, असे आदेश मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.

दौंड तालुका स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरु करण्यात आले असून त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती व अधिकारी वाहनांची व्यवस्था करण्यात यावी, याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. तसेच उजनी धरणाच्या संपादित क्षेत्रात येणाऱ्या खानोटा गावाचे अंशतः पुनर्वसन झाले असून उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रातील ओलाव्यामुळे बाधित घरांचे संपादन व पुनर्वसन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी केली असता याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी, पुणे यांनी प्रांत व तहसीलदार यांच्या समवेत बैठक घेत, स्थळ पाहणी करून आवश्यक त्या जागेचे प्रस्ताव पाठवावेत व पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करावी.

दौंड तालुक्यातील भांडगाव येथील पुणे-सोलापूर महामार्गाचे भूसंपादन चुकीच्या पद्धतीने झाले असून, त्यामध्ये शेतकरी बाधित झालेले आहेत. त्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा व चुकीच्या पद्धतीने झालेले भूसंपादनातून मार्ग काढावा, अशी मागणी राहुल कुल यांनी केली. याबाबत पुणे जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व भूसंपदान अधिकारी यांनी त्यांच्या स्थरावर बैठक घेऊन तातडीने मार्ग काढावा, असे निर्देश मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी दिले.

 

यावेळी आमदार जयकुमार गोरे, महसूल विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, सहसचिव संतोष गावडे, श्रीराम यादव, सुनील कोठेकर, पुण्याचे अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, अवर सचिव संजय जाधव, दौंडचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार अरुण शेलार, भूमि अभिलेख उप अधीक्षक धनराज शिंदे, भूसंपादन अधिकारी वनश्री लाभषेटवार, दौंड नगरपालिकाचे मुख्याधिकारी विद्या पोळ, उजनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

चांदणी चौक-भूगाव उड्डाणपुलाची निविदा रद्द; ४५ कोटींच्या आरोपांनंतर महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

Thursday, 3 September 2026, 23:04

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लिपिक ACBच्या जाळ्यात! ‘कर’ कमी करण्यासाठी मागितली १.२० लाखांची लाच; सांगवीत रंगेहाथ अटक

Thursday, 3 September 2026, 22:48

तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय! आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता थेट FDA च्या रडारवर

Thursday, 3 September 2026, 22:25

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

Thursday, 3 September 2026, 21:38

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11
Next Post
Rural development minister girish mahajan inaugurates nirmal dindi pune

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते निर्मल दिंडीचा शुभारंभ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp