राहुलकुमार अवचट
यवत : दौंड तालुक्यातील खुटबाव येथील पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील ७ दिवसीय विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर नुकतेच श्री क्षेत्र बोरमलनाथ सभागृह येथे संपन्न झाले. ७ दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये प्रथम दिवशी भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. जगदीश आवटे, माजी जि.प.सदस्य भाऊसाहेब ढमढेरे, सूर्यकांत खैरे, जे. के थोरात, प्रा. डॉ. पद्माकर फडतरे, रोहिणी नेवसे, भानुदास नेवसे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबीरामध्ये अनुक्रमे कै. काकासाहेब थोरात स्मृती उद्यानातील स्वच्छता करणे, उद्यानातील झाडांना आळी करून पाणी देणे, उद्यानात व श्री बोरमलनाथ मंदिराच्या परिसरात १५० पेक्षा अधिक झाडे लावणे, उद्यानातील व मंदिराच्या परिसरातील झाडांना रंगविणे, मंदिराच्या परिसरातीलतील दशक्रिया विधी घाट परिसर स्वच्छ करणे यासारखे श्रम करण्यात आले.
शेवटच्या दिवशी यवत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सेवा योजनेचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी – प्राचार्य डॉ. जगदीश आवटे, सुनील सोडनवर, अरुण थोरात, सुदाम भापकर, शरद सोडनवर, शेखर सोडनवर, सतीश अवचट आदी मान्यवर उपस्थित होते.
या ७ दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबीरात अनुक्रमे सोमनाथ कदम, प्रा.डॉ नंदकुमार जाधव, प्रा. डॉ. भाऊसाहेब गव्हाणे, प्रा.डॉ.विकास टकले, प्रा. डॉ. धनंजय भिसे, निवृत्त न्यायाधीश व धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव यांची व्याख्याने झाली. या शिबीराच्या माध्यमातून रक्तदान व आरोग्य तपासणी देखील करण्यात आली.
या शिबीरासाठी कार्यक्रम अधिकारी – प्रा. विकास धुमाळ यांसह प्रा.अक्षता थोरात, प्रा. योगिता दिवेकर, प्रा. डॉ. सुनीता बनकर, प्रा.निखिल होले, प्रा.प्रणय जाधव, प्रा. रोहिणी टेळे, प्रा. प्रदीप बोत्रेप्रा, आरती सुतार, प्रा. प्राजक्ता निंबाळकर, निलेश डोंबाळे, गणेश शिंदे, सागर जाधव यांनी यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी शिबीरात सहभाग घेतला.