युनूस तांबोळी
Popatrav Gawade | शिरूर : राष्ट्रवादी कॅाग्रेसचे जेष्ट नेते शरद पवार यांचे निकटवर्ती सहकारी तथा शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे (Popatrav Gawade )यांची रविवारी ( ता. १९ ) अचानक प्रकृती बिघडल्याने पुणे येथील रूबी हॅालमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांनी दिली.
पोपटराव गावडे हे निमगाव दुडे ( ता. शिरूर ) येथील विविध विकास कामांच्या कार्यक्रमात रविवारी सकाळपासून होते. मात्र दुपारच्या वेळी त्यांना अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना शिरूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तब्येतीची काळजी म्हणून शिरूर येथील डॉक्टरांनी त्यांना पुण्याला हलवण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना याविषयी माहिती समजल्यानंतर त्यांनी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालय प्रशासनाला पोपटराव गावडे यांच्या प्रकृती विषयी कल्पना दिली. त्यांना शिरूरवरून रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून डॉ. जगदीश हिरेमठ हे त्यांच्यावर उपचार करीत आहेत.
शिरूर तालुक्यातील जुने मुरब्बी राजकारणी पोपटराव गावडे…
शिरूर तालुक्यातील जुने मुरब्बी राजकारणी म्हणून पोपटराव गावडे हे जेष्ट नेते पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जातात. शिरूर तालुक्याच्या राजकीय वातावरणात राष्ट्रवादी कॅाग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक निवडणुकींचा अनुभव व राज्यातील राजकारणाचा अभ्यास असणारे त्यांचे नेतृत्व आहे. माजी आमदार सहकारमहर्षी दत्तात्रेय गोवींदराव वळसे पाटील हे पोपटराव गावडे हे जुने सहकारी आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Shirur News : मलठणच्या उपसरपंचपदी दादासाहेब गावडे यांची बिनविरोध निवड