pomfret as state fish : रत्नागिरी : सुरमई, पापलेट, बोंबील, सौदाळा, कोळंबी, खेकडा यासारखी नावं ऐकल्यानंतर मत्स्य खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं असेल. त्यातच खुशखबर म्हणजे पापलेटला राज्य माशाचा दर्जा मिळाल आहे. मात्र, दुसरीकडे राज्य सरकारनं नवा नियम आणला आहे. त्यामुळे आता मत्स्य खवय्यांच्या अडचणी काहीशा वाढल्या आहे. 54 माशांचे आकारमान निश्चित करून त्यांची खरेदी, विक्री आणि मासा पकडण्यावर राज्य सरकारनं निर्बंध घातले आहेत. म्हणजेच जर दिलेल्या यादीतील एखादा जरी मासा निश्चित आकारमाना पेक्षा लहान विकायला ठेवला असेल तर ते आता चालणार नाही.
आकारमान निश्चित केले
आकारमान निश्चित केलेल्या माशांमध्ये बांगडा 140 मिमी, सरंगा 170 मिमी, सिल्वर पापलेट 135 मिमी, चायनीज पापलेट 140 मिमी, सुरमई 370 मिमी, तारली 100 मिमी, झिंगा कोळंबी 90 मिमी, मांदेली 115 मिमी, भारतीय म्हाकूळ 100 मिमी, मुंबई बोंबील 180 मिमी यासह इतर प्रजाती मिळून 54 प्रजातींसाठी हे आकारमान अशाप्रकारे निश्चित केलेलं आहे.
माशांच्या संवर्धनासाठी निर्णय
सध्या समुद्रातच माशांची कमरता असल्याचे दिसून येत आहे. काही मासे हे लुप्त होण्याकडे वाटचाल करत आहेत. त्यामुळे संवर्धनाच्या दृष्टीनं शासनाचा निर्णय महत्त्वाचा मानला जातो. माशांचं संवर्धन होणे आणि लहान माशांची वाढ होऊन मत्स्यसाठा वाढत जाणे या दृष्टीनं सदरचा निर्णय महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता मच्छिमारांसह खवय्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे असलेल्या अडचणींवर मार्ग काढत प्रत्येकानं जबाबदारीनं वागून नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा दुष्परिणाम जाणवतोय. सगळीकडे दुष्काळाची परिस्थीती जाणवत आहे. पुढचा पावसाळा येईपर्यंत पाणीसाठा टिकणार नाही येवढा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे राज्य सरकारत्या या निर्णयाच सर्वांनी स्वागत करावं हेच हिताच आहे.