पुणे : Pune News – जिल्ह्यातील सुमारे १९५ ग्रामपंचायतीतील २८० सदस्य आणि १० थेट सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी १८ मे २०२३ रोजी मतदान होणार आहे. (Pune News) अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे. (Pune News
पोटनिवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार मतदान
निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार हे मतदान होत आहे. नामनिर्देशनपत्र २५ एप्रिल ते २ मे २०२३ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत दाखल करता येतील. २९ एप्रिल, ३० एप्रिल आणि १ मे या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत.
नामनिर्देशनपत्रांची छाननी ३ मे २०२३ रोजी सकाळी ११ वाजेपासून होईल. नामनिर्देशनपत्रे ८ मे २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. १८ मे २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १९ मे २०२३ रोजी होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sarpanch News : ‘लोकशाही’…! ‘सरपंच’ झाला जागा अन ‘टक्केवारी’ बोलू लागली…!
Uruli Kanchan : कोरेगाव मूळच्या सरपंच पदाच्या निवडणुकीला न्यायालयाची स्थगिती..!