Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Politics : पुण्यात महायुतीचं ‘महायुद्ध’! रुपाली ठोंबरेंनी काढले मुरलीधर मोहोळांचे वाभाडे; म्हणाल्या, ‘स्वतःच्या खालचा अंधार आधी पाहा!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 4 January 2026, 18:22
Politics

photo- social media

Politics : महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुणे महापालिकेच्या राजकारणात सध्या चांगलीच रणधुमाळी सुरू असून, या पार्श्वभूमीवर त्यांनी खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर थेट आरोप केले आहेत.

रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, राज्यात आम्ही सगळे महायुतीत आहोत, पण महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना वेगवेगळे लढत आहेत. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप होणारच. मात्र सुरुवात भाजपकडून झाली. मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांवर टीका केली नसती, तर आम्हालाही बोलायची गरजच पडली नसती, असं त्या म्हणाल्या. (Politics)

“मुरली अण्णा आज खासदार आणि केंद्रीय मंत्री झालेत, पण अजित पवार गेली ४० वर्ष राज्याचं राजकारण करतायत. त्यामुळे वडीलधाऱ्या माणसासारखं वागणं अपेक्षित आहे,” असा टोला त्यांनी लगावला. अजित पवारांनी गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांना कडक आदेश दिले आहेत. त्यामुळे मोहोळ यांनी आमच्यावर आरोप करण्याआधी स्वतःच्या गिरेबानात डोकावून पाहावं, असंही त्या म्हणाल्या.

 

“स्वतः खालचा अंधार झाकून ठेवून आमच्यावर बोट दाखवायचं, हे चुकीचं आहे. निवडणुका आल्या की विनाकारण अजित पवारांवर आरोप केले जातात. राष्ट्रवादीने कधीही शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना तिकीट दिलं नाही. पण भाजपाने ज्यांना तिकीट दिलंय, ते फरार आरोपी आहेत. त्यावर मुरली अण्णा कधी बोलणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

“एक बोट आमच्याकडे दाखवत असाल, तर चार बोटं तुमच्याकडे आहेत, हे लक्षात ठेवा,” असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली.

रवींद्र चव्हाण यांच्यावर बोलताना रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, “आता अचानक शहाणपण सुचतंय का? भाजपाचं एकच धोरण आहे  वापरा आणि सोडून द्या. निवडणूक आली की समाजात तेढ निर्माण करायची, नको ती प्रकरणं बाहेर काढायची आणि सत्तेत असल्याचा गैरफायदा घ्यायचा.”

“एवढंच वाटत होतं, तर तीन वर्षांपूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे जायला हवं होतं. प्रदेशाध्यक्षांनी अशा बालिश वक्तव्यांपासून दूर राहिलं पाहिजे,” असा सल्लाही त्यांनी दिला.

प्रवीण दरेकर यांनाही उद्देशून त्या म्हणाल्या की, “ही चौकट आधी मोडली कोणी? भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आधी बोलले, आमच्यावर आरोप केले, त्यामुळे आम्हीही त्यांना जशास तसं उत्तर दिलं, इतकंच.”

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकारण आता आणखी तापण्याची चिन्हं दिसत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46
Next Post
Daund News: Prostitution busted at Anand Hotel Lodging and Bar in Khadki; Six women rescued, joint effort by rural police

Daund News : खडकी येथील आनंद हॉटेल लॉजिंग अ‍ॅन्ड बारवरील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; सहा महिलांची सुटका, ग्रामीण पोलिसांची संयुक्त कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.