Politics कोथरूड, (पुणे) : गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. शरद मोहोळच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्याने पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पुणे शहर आणि ग्रामीण भागातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्ह्या प्रकरणी गुंड शरद मोहोळ याच्यावर गुन्हे दाखल आहेत. स्वाती मोहोळ या कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नी आहेत. शरद मोहोळ विरोधात पुणे, पिंपरी चिंचवड, आणि पुणे ग्रामीण परिसरात गुन्हे दाखल आहेत.
शरद मोहोळ हा दहशतवादी कातील सिद्दीकी याच्या खुनातील आरोपी…!
शरद मोहोळ हा दहशतवादी कातील सिद्दीकी याच्या खुनातील आरोपी आहे. कातिल सिद्दीकीचा येरवडा कारागृहात गळा आवळून खून करण्यात आला होता. त्याच शरद मोहोळच्या पत्नीचा आज भाजपमध्ये प्रवेश झाला आहे.
या सर्व घडामोडी दरम्यान मागील काही महिन्यापूर्वी शरद मोहोळ यांची पत्नी स्वाती मोहोळ यांचा तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश होणार हे निश्चित होते. पण काही कारणास्तव त्यावेळी पक्ष प्रवेश होऊ शकला नाही.
मात्र आजअखेर गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांचा भाजपात प्रवेश झाला. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ तसेच आजी माजी पदाधिकारी देखील उपस्थित होते.
दरम्यान, नव्याने प्रवेश करणाऱ्यांच्या मनात एक भीती असते की आपल्या पक्षात स्थान मिळेल का? उचित सन्मान मिळेल का? फक्त प्रवेश मिळेपर्यंत मागे लागतील, नंतर कोपऱ्यात फेकून देतील, मात्र हा पक्ष येणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान करणारा आहे. स्वाती मोहोळ यांचं कर्तृत्व पाहून पक्ष चांगली जबाबदारी देईल, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Politics : अजित पवार आमच्यासोबत येण्यास इच्छुक असल्यास आम्ही उदय सामंत म्हणाले
Politics News : मुख्यमंत्री पद देऊ : अजित पवारांना आठवलेंची खुली ऑफर!
Mumbai Police : मुंबई पोलीस दल हळहळले ! भरधाव बसच्या धडकेत त्या पोलिस निरीक्षकाचा मृत्यू!