Politics News : शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या आणि उपनेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय ( Politics News ) वातावरण चांगलेच पेटले आहे त्याची पडसाद आज विधानसभेत देखील उमटले. महिला आमदारांनी देखील या प्रकरणी जोरदार प्रश्न उपस्थित करत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील शितल म्हात्रे यांच्या प्रकरणावर विधानसभेत आज भाष्य केले आहे.
शीतल म्हात्रे प्रकरणी पवारांची मागणी…!
“कुठल्याही लोकप्रतिनिधीने काही केलं नसताना कुणी जाणीवपूर्वक असे प्रकार केले, त्यामागे कुणी मास्टरमाईंड असेल, तर आमचं स्पष्ट मत आहे की, याची चौकशी झाली पाहिजे. ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ झालं पाहिजे. वस्तूस्थिती काय आहे हे लोकांना आणि सभागृहाला कळली पाहिजे,” अशी मागणी अजित पवारांनी केली.
याप्रकरणी अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आणि आरोपींना अटकही झाली. मात्र, त्याचे पडसाद थेट विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही पडले. आमदार यामिनी जाधव यांनी शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला.
पवार पुढे म्हणाले की, “राजकीय क्षेत्रात किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करताना स्वतःचं चारित्र्य चांगलं ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. कारण लोक आमच्याकडे ‘पब्लिक फिगर’ म्हणून पाहत असतात. त्यामुळे राजकीय मतं वेगवेगळी असू शकतात, मतमतांतरं असू शकतात. त्याबद्दल मला खोलात जायचं नाही.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
“मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची निवड जनतेतून व्हावी”, अजित पवार यांची मागणी..!
राष्ट्रवादी नेते अजित पवार यांचा वडूज नगरीत सुसंस्कृतपणे भाजपने केला निषे