दिल्ली Politics News : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज (ता. ११) जाहीर झाला. यामध्ये न्यायालयाने म्हटले की ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी नेमलेले व्हिप भरत गोगावले बेकायदेशीर आहे. (Politics News ) तर 16 आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. (Politics News ) तसेच जुनं सरकार परत आणण्याचे न्यायालयाने फटकारले असल्याने महाराष्ट्रात शिंदे सरकार कायम राहणार आहे. त्यावर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Politics News )
न्यायालयाने माझी निवड बेयकायदा असल्याचे मत नोंदवले आहे. मात्र हा निकाल नाही. त्यामुळे याचा कोणताही परिणाम होणार नाही. असे भरत गोगावले यांनी सांगितले.
न्यायालयाची निरीक्षणे…
– सत्ता संघर्षाचे प्रकरण 7 न्यायमूर्तीच्या घटनापीठाकडे
– गटनेत्यापेक्षा राजकीय पक्षाने दिलेला व्हिप 10 व्या सुचीसाठी
– व्हिप फक्त राजकीय पक्ष देऊ शकतो.
– भरत गोगावले यांची नियुक्त बेकायदा, प्रतोदपदी निवड बेकायदा
– राज्यपालांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणे चुकीचे
– राज्यपालांनी बहुमत चाचणीला बोलवणे चुकीचे
– राज्यपालांकडे कोणतेही ठोस पुरावे नव्हते
– ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार परत आणले असते.
– 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : महाराष्ट्र सत्तासंघर्ष ! शिंदे गटाला मोठा धक्का ; भरत गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीर
Big News : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाच्या वाचनाला सुरुवात…