युनूस तांबोळी
शिरूर – Politics : राज्याच्या राजकारणात महत्वाची मंत्रीपदे भुषवलेले व माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटिल यांचे कट्टर समर्थक भिमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष व आंबेगाव बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांना बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने त्यांनी ‘एकला चलो रे पण साहेबांच्या फोटो सोबत’ असे म्हणत अपक्ष निवडणूक लढवित आहेत. (Politics)
आंबेगाव – शिरूर विधानसभा मतदार संघात सर्वसामान्य नागरिकांत संभ्रमाचे वातावरण
शिरूर आंबेगाव च्या राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या राजकारणात नेहमी सक्रिय असणारे निकम यांची उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या बंडखोरीमुळे शिरूर आंबेगाव चे राजकारण ढवळून निघणार का? भविष्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत या बंडखोरी चे कोणते पडसाद उमटणार? वेगवेगळ्या प्रश्नांनी आंबेगाव – शिरूर विधानसभा मतदार संघात सर्वसामान्य नागरिकांत संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.
आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ची निवडणूक लागली पण यामध्ये निकम यांना उमेदवारी नाकारली गेली. मला राजकारणातून संपविण्याचा डाव राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षातूनच होत असल्याचे सांगून वळसे पाटिल यांचा आदेश झुगारून त्यांनी अपक्ष निवडणुक लढवित आहेत. त्यातून आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी कॅाग्रेस मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. यामुळे निकम यांना पक्षातून हकलापट्टी करण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्याची माहिती समोर आहेत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ज्या दिवशी जाहीर झाली. त्यावेळीच पक्षाकडून निकम यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, निकम यांनी आपली भूमिका मांडत आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. पक्षाच्या सर्व मी कारभारात सहभागी होतो. भिमाशंकर कारखान्याला देशभरात नावलौकीक मिळवून दिला. आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती डिजीटल करून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले. बाजार समितीतून शेतकरी उपाशी जाऊ नये यासाठी अगदी कमी पैशात जेवन मिळण्यासाठी भोजनावळ सुरू केली.
रस्ते, विज, पाणि असे शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या सोडविल्या. बंधारे, चाऱ्या, कालवे यातून शेतकऱ्यांना पाणी कसे मिळेल यासाठी कार्यरत राहिलो. रात्रीची विज व बिबट्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी लढा देत आहे. राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाची कार्यकर्त्यांची बांधणी केली. मात्र, मलाच उमेदवारी का नाकरण्यात आली असा सवाल करत निकम हे सध्या मतदारांसमोर जात आहे.
या बंडखोरीतून शिरूर आणि आंबेगाव चे राजकारण देखील ढवळून निघणार आहे. या राजकाराणात राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षात नाराज गट पुन्हा सक्रिय होऊन एकत्रीत येणार का ? अनेक वर्षे वेगवेगळ्या पदासाठी उमेदवारी न मिळाल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नाराज गट देखील मोठा आहे. या विधान सभेत वळसे पाटिल सांगतिल ती दिशा…असे राजकारण होत होते.या बंडखोरीमुळे त्यांच्या विचारसरणीला तडा जाईल का ? असा सवाल सामान्य नागरिक करू लागला आहे.
शिरूर मधिल राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षातील राजकारणात वळसे पाटिल यांचा सहभाग महत्वाचा समजला जात होता. निकम हे त्यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यातून भविष्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत तिकीट वाटप केले जाते. मात्र त्यातून काहि जिल्हा परिषद व पंचायत समिती गटात नाराजी होऊन चांगल्या कार्यकर्त्यांची फळी मोडकळीस आली होती.
या निवडणुका मध्ये सगळ्यांना समान संधी देण्यात वळसे पाटिल कितपत समर्थ राहणार असा प्रश्न उपस्थित करत आहेत. आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये बंडखोरी झाल्याने त्याचा परिणाम भविष्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये दिसून येणार असेच काहि प्रमाणात मतदार उघड पणे बोलू लागला आहे.
दरम्यान, निवडणुकी पुरते राजकारण नंतर पुन्हा एकत्रीत यावे लागेल. असा विषय सध्या या मतदार संघात होऊ लागला आहे. राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाच्या अंतर्गत वादामुळे त्यांना नुकतीच भिमाशंकर कारखान्याची निवडणुक लढविण्यास भाग पाडले होते. त्यानंतरआंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला सामोरे जावे लागत आहे. त्यापेक्षा जनतेचा कौल मोठ्या प्रमाणात असल्याने विरोधकांची पाया खालची वाळू सरकली आहे. सर्वसामान्यांच्या अडचणी व समस्यांसाठी धावून जाणारा व त्यांच्यात नेहमीच रमणारा म्हणून निकम यांची ओळख झाल्याने भविष्यात निकम हेच वळसे पाटिल यांना ‘आमदार’ की साठी विरोधक असल्याचे भासवून त्यांना या निवडणुकी पासून दूर ठेवल्याची चर्चा सध्या आंबेगाव तालुक्यात आहे.
वळसे पाटिल साहेब हे माझ्या ह्रदयात आहेत. राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षातील वादाने मला उमेदवारी नाकारली असली तरी त्यांच्या फोटो सोबत मतदारांसमोर जाऊन मत मागणार, शेतकरी हितासाठी तत्वाने राजकारण करणार. पक्षात आल्यापासून सर्वसामान्य नागरिक व शेतकरी हिताला महत्व दिले आहे. त्यांच्या प्रश्नासाठी अहोरात्र कार्यरत राहणार. शेतकऱ्य़ांच्या समस्या सोडविल्यानेच आंबेगाव तालुक्याने माझ्यावर विश्वास ठेवला आहे.
देवदत्त निकम
माजी सभापती आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News | पंधरा वित्त आयोगातील मंजूर कामे पुर्ण न झाल्याने उपोषणाचा इशारा…