Politics News पुणे : अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला हजर असणारे शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Politics News)कोल्हे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले आहे. (Politics News) त्यासाठी अमोल कोल्हे यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. (Politics News)
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या ४० सहकारी आमदारांसोबत भाजप आणि शिवसेनेशी हात मिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची राजभवनावर रविवारी (ता.२) शपथ घेतली. यावेळी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, बाबुराव अत्राम, संजय बनसोडे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली होती. यावेळी राष्ट्रवादीचे फक्त आमदारच नाही तर २ खासदार देखील अजित पवारांच्यासोबत गेले होते.यामध्ये डॉ.अमोल कोल्हे आणि सुनील तटकरे यांचा सहभाग होता.
अजित पवारांना पहिला धक्का
दरम्यान, अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला अमोल कोल्हे काल राजभवनात उपस्थित होते. त्यामुळे अमोल कोल्हे अजित पवारांच्या पाठिशी असल्याचे म्हटले जात होते. मात्र आज त्यांनी मी साहेबांसोबत असल्याचे ट्वीट केले आहे. अमोल कोल्हे यांच्या घरवापसीने आता अजित पवार यांना पहिला धक्का बसला असल्याचे समोर आले आहे.
अमोल कोल्हे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये “जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं। #मी_साहेबांसोबत” असे म्हटले आहे.
याबाबत खासदार अमोल कोल्हे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही