Political News | पुणे : भाजप नेते गणेश बिडकर यांच्याकडे तब्बल 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने देखील एका बिल्डरकडे 3 कोटी रूपयाच्या खंडणीची मागणी…
अलीकडेच पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने एका बिल्डरकडे 3 कोटी रूपयाच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आज बिडकर यांच्या नावे खंडणी मागितल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी गणेश बिडकर (50, माजी नगरसेवक, रा. 316, सोमवार पेठ) यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिडकर हे श्रीराम जयंतीच्या मिरवणुकीमध्ये असताना त्यांना 30 मार्च रोजी एका नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल आला. त्यावेळी बिडकर यांना कॉलवर शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.
तो म्हणाला, तुला राजकीय मस्ती आली आहे, तेरे पास बहोत पैसे हो गया है, अब थोडा खर्चा भी कर, नाही तर तुझी बदनामी करून तेरा पुलिटीकल करिअर बरबाद करूंगा, तु चुपचाप 25 लाख रूपये दे, तुने अगर पैसे नही दिये तो तु देख कैसे खेल शुरू होनेवाला है. असे बोलुन त्याने बिडकर यांना शिवीगाळ केली.
पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Politics News : सुषमा अंधारे शिरसाटांवर भडकल्या ; लेकीबाळींकडे बघण्याची त्यांची दृष्टी किती गलिच्छ