पुणे: पोलिस शिपायाला सायबर चोरट्यांनी चक्क पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. यामुळे पोलीसच ऑनलाईन टास्कच्या अमिषाला बळी पडले आहेत. याबाबत 29 वर्षीय पोलीस शिपायाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या तक्रारीवरून एका अज्ञात मोबाईल धारक व टेलिग्राम आणि बँक खातेधारक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई हे शिवाजीनगर पोलीस लाईन येथे राहण्यास आहेत. एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जाहीराती तसेच पोस्ट लाईक् करून दिल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगितले.
त्यानंतर त्या पोलीस शिपायाने काम करायला सुरुवात केली आणि सुरुवातीला त्यांना चांगला परतावा दिला. यानंतर मात्र आरोपीकडून पोलीस शिपायाला गुंतवणुकीचे आमिष दाखविण्यात आले. तसेच ऑनलाइन कामात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून सायबर चोरट्यांनी पोलीस शिपायाकडून वेळोेवेळी ४ लाख 99 हजार रुपये घेऊन गंडा घातला.