वाघोली : पुणे महानगरपालिकेत वाघोली ग्रामपंचायतीकडील ७९ कर्मचाऱ्यांना पुणे मनपात नुकतेच समावेश करून घेण्यात आले आहे. नव्याने समावेश झालेल्या कर्मचाऱ्यांना पोलिस व्हेरिफिकेशन करून घेणे बंधकारक असल्याची माहिती महापालिका वडगावशेरी-नगररोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर यांनी दिली.
वाघोली ग्रामपंचायतीकडे यापूर्वी असणाऱ्या ७९ कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे वेतन मिळणार आहे. त्याचबरोबर वाघोलीचा समावेश झाल्यापासूनचा वेतनातील फरक देखील दिला जाणार आहे.
वाघोलीचा पुणे महानगरपालिकेत समावेश झाल्यानंतर तत्कालीन ग्रामपंचायतीच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना पुणे महानगरपालिकेच्या तात्पुरत्या आस्थापनेवर समाविष्ट करून घेण्यात आले होते. त्यांना ग्रामपंचायतीमध्ये दिल्या जाणाऱ्या वेतनानुसारच वेतन महापालिका अदा करत होती. या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत वर्ग करून घेण्यासाठी वाघोलीतील लोकप्रतिनिधी, आजी-माजी पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांनी पाठपुरावा केला होता.
या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून, ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या कायमस्वरूपी सेवेत वर्ग करून घेण्याबाबतची अधिसूचना पुणे महानगरपालिकेने काढली आहे. तसेच त्यांना ३० जून २०२१ पासूनचा वेतनातील फरक सुद्धा मिळणार आहे. मात्र, नुकतेच समावेश करून घेण्यात आलेल्या ७९ कर्मचा
ना पोलिस व्हेरीफिकेशन सर्टीफिकेट बंधन कारक असल्याचे आदेश सहाय्यक आयुक्त बनकर यांनी दिले आहेत.
काही कर्मचारी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असू शकतात त्यामुळे पोलिस व्हेरिफिकेशन असणे गरजेचे आहे. यामध्ये जर गुन्हेगारी प्रवृत्तीचे कर्मचारी आढळून आल्यास त्यांचा वेगळा निर्णय घ्यावा लागणार आहे.
– सोमनाथ बनकर, सहाय्यक आयुक्त, वडगावशेरी-नगररोड क्षेत्रीय कार्यालय.