पुणे : पुण्यात राजीव गांधी पुलाजवळ उभारण्यात आलेल्या स्थिर पडताळणी कक्षाने आज एका वाहनातून तब्बल १ कोटी ६२ लाख रुपयांचे सोने चांदी जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई शनिवारी १६ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली आहे. या जप्त केलेल्या सोने चांदीची पडताळणी आयकर विभाग तसेच जीएसटी विभागामार्फत करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम.एच.४३ बी के ५८०६ हे वाहन शनिवारी पहाटे पोलिसांनी थांबविले. त्यावेळी वाहनचालक योगेश कुमार परमार याच्याकडे चौकशी केली असता, त्यामध्ये तब्बल ४ लाख १६ हजार ६३२ रुपयांची ४ किलो ४७९ ग्रॅम चांदी तसेच तब्बल १ कोटी ५७ लाख ९६ हजार १२४ रुपयांचे २ किलो ५११ ग्रॅम सोन्याचे पार्सल निदर्शनास आले आहे. हे सोने तसेच चांदी विविध ज्वेलर्स यांनी मागविन्यात आले आहेत. ते पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कुरिअरमार्फत पोहोच करायचे आहेत.
दरम्यान, पोलिसांनी चालक तसेच वाहन ताब्यात घेऊन चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. या प्रकरणी आयकर विभाग आणि जीएसटी विभागाकडून त्याची पडताळणी सुरु आहे. याबाबत पुढील कारवाई चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात केली जात आहे.