पुणे: संततधार पाऊस सुरु असल्यामुळे पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण येथील मैदान शारीरीक/मैदानी चाचणी घेण्यासाठी योग्य नाही. तसेच भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे उमेदवारांची गैरसोय टाळणेसाठी नऊ ते अकरा जुलै या कालावधीत होणारी पोलीस शिपाई पदाची शारीरिक व मैदानी चाचणी नैसर्गिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे की, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण घटकाअंतर्गत दि.०९.०७.२०२४ पासून पोलीस शिपाई पदाची शारीरीक व मैदानी चाचणीसाठी उमेदवारांना बोलावण्यात आलेले आहे. तथापि आठ जुलै रोजी मैदानाची पाहणी केली असता संततधार पाऊस सुरु असल्यामुळे पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण येथील मैदान शारीरीक चाचणी/मैदानी चाचणी घेण्यासाठी योग्य नाही. तसेच भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्हयात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे उमेदवारांची गैरसोय टाळणेसाठी नऊ ते अकरा जुळ्या या कालावधीची पोलीस शिपाई पदाची शारीरिक व मैदानी चाचणी नैसर्गिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. उमेदवारांना शारीरिक व मैदानी चाचणीचा दिनांक नंतर कळविण्यात येईल. सदर बाबीची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असं या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.