पुणे : पुणे पोलीस दलातील पोलीस भरती येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पोलीस भरती प्रक्रिया १८ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत स्थगित करण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस मुख्यालयाचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे.
दरम्यान, पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात या भरतीची मैदानी चाचणी सुरू असून भरतीला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात उमेदवार येत आहेत.
अशातच, पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पुण्यातील पोलीस भरती २७ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.