पुणे : धनकवडी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने मंगळवारी छापा टाकून दहा जणांना ताब्यात घेतले. आरोपींकडून २२ हजार रुपयांची रोकड व मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत.
अजय शिरसाठ (वय ४८, रा. धनकवडी), किरण किसन कानकर (वय ३२, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी), गणेश कदम (वय ३५, रा. पद्मावती), दीपक दोडे (वय ५५, रा. बिबवेवाडी), दादासाहेब जोगदंड (वय ३५, रा. पद्मावती), बसू सिगली (रा. मार्केटयार्ड), अर्जुन थोरात (वय ४९, रा. धनकवडी), बबन कांबळे (वय ५२, रा. बिबवेवाडी), उत्तरेश्वर साठे (वय ५५, रा. आंबेगाव), चंद्रकांत बाड (वय ३५, रा. धनकवडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. धनकवडी भागातील नसरवान पेट्रोल पंपाजवळ मटका अड्डड्यावर पोलिसांनी धाड टाकली.