पुणे : येथील कल्याणनगरमधील झालेल्या अपघाता प्रकरणी अल्पवयीन आरोपीला जामीन देण्यात आला आहे. मागील रविवारी पहाटे कल्याणीनगर परिसरात एक भीषण अपघात झाला होता. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने पोर्शे कारने दुचाकीवरुन जाणा-या तरुण-तरुणीला चिरडले होते. यामध्ये इंजिनियर असलेल्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघातातील या प्रकरणात अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलाला जामीन देण्यात आला आहे. या अपघातात आता पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
यावेळी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मिळाला आहे. परंतु आम्ही या विरोधात सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. मुलाचे वडिल आणि त्याला दारु देणा-या पब मालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरेगाव पार्क, कल्याणी नगर भागातील पब आणि बारवर कारवाई करण्यासाठी एक्सईज डिपार्टमेटसोबत काम करणार आहोत. यावेळी कोणालाही वाचवण्यात येणार नाही. विना नंबर प्लेट गाडी देणा-या डीलरवर देखील कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजचाही तपास करण्यात येईल. तसेच हा मुलगा खरच अल्पवयीन आहे का याचा तपास त्याच्या शाळेत जाऊन करण्यात येत आहे. हा मुलगा दारु पिऊन गाडी चालवत होता हे स्पष्ट झाले. तसेच हे घडलेले प्रकरण खूप गंभीर आहे. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात 304 अंतर्गत कलम लावण्यात आले आहे. हा आरोपी अल्पवयीन आहे त्यामुळे त्याला निरीक्षणगृहात ठेवण्याची मागणी केली होती. आमची मागणी फेटाळण्यात आली. आम्ही या प्रकरणात सत्र न्यायालयात अपील करणार आहोत. पालकांनी एवढी महागडी गाडी दिली, त्याला दारु पिण्यास परवानगी दिली म्हणून त्यांच्यविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.