काव्यपुष्प – ये मेघराजा… ( कवी- युनूस तांबोळी, शिरूर) (Poem : Ye Meghraja… Yunus Tamboli)
नभात ढग गर्जती !
जीव टांगणी लागती !
सरीवर सरी गोळ पाण्याच संगती!
माघारी जा रे आता कृपा कर आम्हा वरती!…
ये मेघराजा…?
अवेळी येऊन घोर जीवाला लागतो !
शेतातल सोन माझ माती मोल करतो !
पाण्याच गोळ मारून अंकूर संपवतो!
पाणी पाणी करुन बळी माझा ठरतो !…
ये मेघराजा…?
धरणी मातेन दिली साथ आम्हास!
हिरावून घेतोस पोटचा तू घास!
जगायचे कसे असा तू बरसलास!
गाऱ्हाणे ठेवतो आमुचे करतो तुझ्या पायास!…
ये मेघराजा…?
निसर्गाचा नियम धरतीशी तुझ व्हाव मिलन!
बिज अंकुराव हिरवगार लेण लेऊन!
संगती तुझ्या खेळाव आमुच्या चिमुकल्यांन!
असा बरस धनधान्य देऊन !
ये मेघराजा…?