पुणे : पीएमपीएमएलकडून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह पीएमआरडीए हद्दीत रक्षाबंधन सणानिमित्त १९ व २० ऑगस्ट २०२४ रोजी नियोजित १६९२ शेड्युल व्यतिरिक्त १३० जादा बसेस अशा एकूण १८२२ बसेस गर्दीच्या मार्गावर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या दोन दिवसांत पीएमपीच्या तिजोरीत दोन कोटी पाच लाख ८९ हजार ८९१ रुपये इतके उत्पन्न मिळाले.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील वाहक, चालक, पर्यवेक्षकीय सेवक यांच्या साप्ताहिक सुट्टया रद्द केल्या होत्या. त्याबरोबर महत्त्वाच्या स्थानकांवर बस संचलन नियंत्रणासाठी परिवहन महामंडळाकडील अधिकारी, लिपिक सेवक व इतर कर्मचारी यांची महत्त्वाच्या स्थानकांवर व थांब्यांवर प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी व वाहतूक नियंत्रण करण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती. पीएमपीएमएलच्या बससेवेला १९ व २० ऑगस्ट २०२४ रोजी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला.