पिंपरी : दिव्यांग मुलांना बसमध्ये घेण्यासाठी रस्त्याच्या बाजूला बस थांबवली असता दोघांनी पीएमपी बसचालकाला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि.२४) दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास निगडी येथील कामायनी विद्यामंदिर समोर घडली.
सतीश दत्तू राठोड (वय ३६, रा. चिखली) यांनी निगडी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार विनायक पाटील, स्वराज विनायक पाटील (वय २१, रा.निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. फिर्यादी राठोड यांनी निगडी येथील कामायनी विद्यामंदिर शाळेत विद्यार्थ्यांना घेण्यासाठी बस रस्त्याच्या बाजूला थांबवली असता विनायक याने राठोड यांना मारहाण केली. मुलगा स्वराज यांनी देखील राठोड यांना मारहाण केली.