पुणे: पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. विद्यार्थ्यांनी संपूर्ण परीक्षा दिल्यानंतरही फी न दिल्यामुळे शाळेने तब्बल एक हजारांहून आधिक मुलांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या या अनागोंदी कारभारावर पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा अंतिम निकाल सर्व ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे. मात्र, पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेच्या इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल ही फी न भरल्यामुळे राखून ठेवला आहे. तब्बल एक हजारांपेक्षा आधिक विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवल्याची माहिती मिळत आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा, यासाठी स्कॉलशिप सारख्या परीक्षा घेतल्या जातात. परंतु, महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांवरती अन्याय झाला आहे.