पुणे: अरूंद रस्ते आणि पादचारी मार्गावर अनाधिकृतपणे गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल उभारणाऱ्या २२९ व्यावसायिकांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. त्यामध्ये सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाने ३४ नोटीस दिल्या आहेत. तर येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एकाही गणेश मूर्ती विक्रेत्याला नोटीस बजाविण्यात आलेली नाही. दरवर्षी महापालिकेकडून गणेश मूर्ती विक्रीसाठी ज्या जागा निश्चित केल्या आहेत, तेथे दुकान न घाटता विक्रेत्यांनी त्यांच्या सोईनुसार रस्ते, आणि पादचारी मार्गावर मांडव चालून गणेश मूर्तीची विक्री करतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे.
त्यामुळे पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयांनी अनाधिकृत स्टॉलला नोटीस बजाविली आहे. नगर रस्ता क्षेत्रिय कार्यालयाने येरवडा ९, कळस २१, ढोले पाटील ३, औंध बाणेर २९, शिवाजीनगर घोले रस्ता १२, कोथरूड बावधन ८, धनकवडी सहकारनगर २४, सिंहगड रस्ता ३४, वारजे कर्वेनगर ७, वानवडी रामटेकडी १, कसया विश्रामबाग १८, भवानी पेठ ८, बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाने २५ गणेश मुर्ती विक्रेत्यांना नोटीस दिली आहे, असे पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांनी सांगितले.