पुणे: हडपसर, मांजरी बुद्रुक येथील जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय ननावरे यांचा पुणे महानगरपालिकेकडून सन्मान करण्यात आला.
ननावरे यांनी वेळोवेळी तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी विविध प्रकारचा लढा देऊन त्यांच्यासाठी अनेक शासकीय योजना मिळवून देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. त्यांच्या या विशेष सामाजिक कार्याची दखल घेत व नुकताच संपन्न झालेल्या दिव्यांग दिनाचे औचित्य साधून त्यांना पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खैमणार यांनी बालगंधर्व रंगमंदिरात शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या कार्याबद्दल मांजरी बुद्रुक येथील विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या वतीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दत्तात्रय ननावरे हे स्वतः दिव्यांग असून, समाजातील इतर लोकांना लाजवेल असे काम करत आहे. दिव्यांगाने दिव्यांगांसाठी चालविलेले एक चालते बोलते व्यासपीठ म्हणजे दत्ता ननावरे आहे. याची विशेष दखल पुणे महानगरपालिकेने घेत त्यांचा सन्मान केला.