पुणे : पुण्यात मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज नियोजित असलेला पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण होणार आहे. तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजनही होणार होते.शहरातील एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची सभा देखील होणार होती. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहर आणि परिसरात सुरु असलेल्या पावसामुळे सभास्थळी चिखल आणि दलदल साचली आहे.
मात्र, आज देखील पुण्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्यामुळे पंतप्रधान मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामळे पुणे मेट्रोच्या सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला आहे.
PM Narendra Modi’s visit to Pune, Maharashtra cancelled due to the heavy rain situation in the city.
(File photo) pic.twitter.com/VJlrBepmzM
— ANI (@ANI) September 26, 2024