केडगाव/संदीप टूले : दौंड तालुक्यातील केडगाव येथील संस्थेची जमीन बनावट व्यक्ती उभा करून तसेच संस्थेचे बनावट सही, शिक्के वापरून खरेदी खत केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी निसा हुसमेद मेहदियाबदी (रा.नाना पेठ, पुणे) यांनी फिर्याद दिली असून, त्यांच्या फिर्यादीनुसार यवत पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहराब रूस्तुम यगानगी (रा. विल्यम्स गार्डन, पुणे), महेष दत्तात्रय काशीद (रा.मेडद, ता.बारामती, जि.पुणे), पंढरीनाथ गुलाबराव भंडलकर (रा.नानगांव, दौंड), अमोल बापु भोसले (रा.खंडोबानगर, बारामती) तसेच मो. इम्तियाज कासम अन्सारी (रा.मोहमदवाडी, हडपसर) रवींद्र गोविंद गाडेकर (रा. केडगाव,ता.दौंड), पंढरीनाथ गुलाबराव भांडलकर (वय ५० रा. दापोडी, दौंड), यांच्यावर गुन्हा दाखल केला.
या सर्व आरोपींनी 29/10/2021 ते 13/10/2022 दरम्यान केडगांव (ता.दौंड,जि.पुणे) येथे संगनमत करून फिर्यादी यांच्या संस्थेचे बनावट लेटर पॅड, संस्थेचे बनावट शिक्के तयार केले. तसेच संस्थेच्या चेअरमन व सेक्रेटरी यांच्या बनावट सह्या करून त्यांच्या आधारे केडगांव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सस्थेच्या मालकीची केडगांव येथील जमीन गट नं.191 चे खरेदीखत दस्त करून सस्थेची व शासनाची फसवणुक केल्याने फिर्यादी निसा हुसमेद मेहदियाबदी यांनी आरोपींविरुद्ध फिर्याद दिली आहे.
या घटनेचा पुढील तपास यवतचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार सहाय्यक पोलिस निरीक्षक बावकर हे करत आहेत.