Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणावळा येथील शासनाची कोट्यावधी रुपयांची जागा हडपण्याचा डाव फसला; सरकारी आकारी पड  नोंदीचा तातडीने आदेश

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 1 May 2025, 1:42

पुणे: मावळ तालुक्यातील लोणावळा येथील शासनाची कोट्यावधी रुपयांची जमीन बनावट आदेशाने व वारसनोंदीने हडपण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील गांभीर्याता लक्षात घेत मावळ भूमि अभिलेखच्या उप अधीक्षक पल्लवी पिंगळे यांनी पुनर्विलोकन निर्णय देत संबधित जमीनीच्या  उताऱ्यावर “सरकारी आकारी पड” ह्या नोंदीचा तातडीने आदेश दिला आहे. बनावट आदेश व वारसनोंद प्रकरणी प्रकाश पोरवाल यांनी तक्रार केली होती.

या आदेशामुळे शासनाची जागा गिळंकृत करण्याचा डाव असफल ठरला आहे. शासन आदेशानुसार  उताऱ्यावर अंमलबजावणी झाली. मात्र उताऱ्यावर झालेल्या वारसनोदींची स्वयंसूची शासकीय कार्यालयात आढळत नसल्याचे परिरक्षण भूमापकाने लेखी कळवले आहे. त्यामुळे शासन आदेश व वारस नोंद याबाबतचे कागदपत्रे उपलब्ध नसताना शासकीय जागेची मालकी कोणी व कशासाठी बदलली? हा संशोधनाचा विषय बनला आहे. नगर भूमापन कार्यालय लोणावळा व उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय मावळ या कार्यालयातील कागदपत्रे कोणी गायब केली, याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

प्रस्तुत वारस नोंद खोटी असल्याची तक्रार, तक्रारदाराने जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख कार्यालयात केल्याने भूमी अभिलेख कार्यालय मावळ हे खडबडून जागे झाले. तक्रारदारांचा अर्ज व जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख पुणे यांच्याकडील आदशान्वये 2011 साली वारस नोंद झाली होती. ही वारसनोंद तब्बल तेरा वर्षानंतर मावळच्या उपअधीक्षक कार्यालयाने रद्द केली.

लोणावळा येथील एच वार्ड मधील सिटी सर्व्हे नबंर 35 यासी 46 गुंठे क्षेत्र आहे. सुरुवातीपासून म्हणजे 1930 सालापासून हा उतारा ‘सरकारी आकारी पड’ नावाने आहे. फेरफार क्रमांक 2168 ने सर्व्हे नंबर 226/1 यांसी सरकारी आकारी पड क्षेत्र 770.63 चौ.मी. व 226/2 ला सार्वजनिक बांधकाम खाते विभाग पुणे क्षेत्र 3782.00 चौ.मी.चा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागास तहसीलदार मावळ यांच्याकडील हुकूम नं.तमक वर्ग/1286/87 दि.10/09/1987 अन्वये दिलेला असल्याचे त्यात नमूद आहे.

 

दरम्यान उपसचिव महाराष्ट्र राज्य, महसूल व वनविभाग मेमोरंडम क्रमांक PWN -1148/35307- Rev & Forest Dept दि.1/11/71 या प्रमाणे जमीन ग्रांट केल्याचा हुकूम व जमाबंदी आयुक्त संचालक भूमि अभिलेख पुणे यांच्याकडील LR 12 दि.15/11/71 या प्रमाणे खाजगी व्यक्तीचे नाव मिळकत पत्रिकेवर दाखल आहे. संगणकीकृत मिळकत पत्रिकेवर जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडील बिनशेती आदेशाने नोंद केली आहे. मात्र नोंदीच्या तारखांमध्ये तफावत दिसून येते. संगणकीय मिळकत उता-यावर दि. 17/11/1971 ऐवजी दि.26/4/1969 असे नमूद आहे. त्यामुळे नोदींत विसंगती दिसून येत आहे. तसेच वारसनोंदीची स्वयंसूची धारिका आढळत नसल्याबाबत परिरक्षण भूमापक यांनी लेखी कळवले आहे.

बोगस आदेश व खोटी वारस नोंद यापासून शासनाची जागा वाचवली आहे. भ्रष्ट अधिकाऱ्याने पुरावा नष्ट करण्यासाठी संचिका गायब केलेली आहे. खाजगी व्यक्ती व शासकीय अधिकारी यांच्या संगनमताने खूप मोठा आर्थिक व्यवहार झालेला आहे. तसेच इतरही सर्व्हे नंबर बाबत माझी लढाई सुरू आहे. याबाबत मी महसूलमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे. शासकीय जागा हडप करण्यात सहभागी असलेल्या व्यक्तींवर तसेच नगर भूमापन कार्यालय व उपअधीक्षक कार्यालय मावळ मधील दोषी अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे.

 -प्रकाश पोरवाल, तक्रारदार लोणावळा.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे 3782.00चौ.मी.इतके क्षेत्र आहे. भूमापन क्रमांक 35 या मिळकतीच्या  उताऱ्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाची फेरनोंद करण्यासाठी भूमी अभिलेखाच्या कार्यालयास कळविले आहे. तसेच बनावट आदेश व खोटी वारसनोंद याबाबत गुन्हा दाखल करण्याबाबत भूमि अभिलेख मावळ तसेच नगर भूमापन कार्यालय लोणावळा यांना पत्र दिले आहे.

-ध.ह.दराडे, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मावळ.

पुनर्विलोकन निर्णयानुसार मौजे लोणावळा येथील सिटी सर्व्हे नंबर 35 या मिळकतीच्या मिळकत पत्रिकेवरील दि.17/11/1971 प्रमाणे आदेशाने घेतलेली नोंद, बिनशेती सारा नोंद व वारसनोंद रद्द केलेली आहे. तसेच मालक सदरचा सरकारी आकारी पड ही नोंद पुनर्जिवीत करण्याचा आदेश दिला आहे. त्या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केलेला आहे.

-पल्लवी पिंगळे, उप अधीक्षक भूमि अभिलेख मावळ.

मी नुकताच जिल्हा अधीक्षक पदाचा पदभार स्विकारला आहे. संबंधित प्रकरणात तक्रारदार यांनी कोणत्या कार्यालयाकडे अर्ज दाखल केला आहे. त्याविषयी काही माहिती नाही. संबधित प्रकरणात माहिती घेऊन त्याबाबत पुढील आठवड्यात माहिती दिली जाईल.

– मंगला कमाने, जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख पुणे

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

दुष्काळावर बोलताना विखेंची जीभ घसरली? ‘साधेपणाने लग्न करणाऱ्यांना मुलं झाली नाहीत का…..

Sunday, 27 September 2026, 23:11

‘छातीत दुखतंय…’ एवढंच म्हणाली अन् जीव गेला! आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू,नेमकं घडलं काय?

Sunday, 27 September 2026, 22:06

दुष्काळी यादीत नाव नाही? शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; आता मिळणार दिलासा..

Sunday, 27 September 2026, 21:42

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं! पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Sunday, 27 September 2026, 21:03

शरद पवार पुन्हा मैदानात! मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र; कोणत्या 17 मागण्यांचा उल्लेख?

Sunday, 27 September 2026, 20:44

पुण्यात 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; 52 वर्षीय कंत्राटी कामगार पोलिसांच्या ताब्यात,सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक अन्…….

Sunday, 27 September 2026, 20:06
Next Post

इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात 'या' विविध पदांची भरती ; कसा कराल अर्ज?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp