राजेंद्रकुमार शेळके
पुणे : पिरंगुट (ता. मुळशी) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयात प्लास्टिक संकलन योजनेचे आयोजन करण्यात आले होते. नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व्हावे व परिसर प्लास्टिकमुक्त व्हावा, या हेतूने प्लास्टिक संकलन केले जाते. संकलन केलेले प्लास्टिक पुन्हा रिसायकलिंगसाठी पाठविले जाते जेणेकरून परिसर प्लास्टिकमुक्त होऊन पर्यावरणाचे जतन केले जाते. राज्याचे उपमुख्यमंत्री व संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अजित पवार यांच्या संकल्पनेतून त्यांच्याच जन्मदिनी या योजनेची सुरुवात झाली होती. वर्षातील प्रत्येक महिन्याच्या २२ तारखेला महाविद्यालय व परिसरातील प्लास्टिक गोळा करून ते महाविद्यालयात संकलन केले जाते.
परिसर प्लास्टिकमुक्त व्हावा तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व्हावे या हेतूने प्लास्टिकचे संकलन केले जाते,असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी बोलताना सांगितले. या वेळी उप प्राचार्य डॉ. प्रविण चोळके, डॉ. शिवाजी शिंदे, प्रा. मिनाली चव्हाण, प्रा. अश्विनी जाधव, डॉ. रेखा जोशी, डॉ. महेश कांबळे, महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.