राहुलकुमार अवचट
Mla Rahul Kul News : यवत : पालकमंत्री स्तरावरील योजनांचा फेर आढावा घेण्यात यावा. अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कडे केली आहे. (Plans at Guardian Minister level should be reviewed: MLA Rahul Kul)
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पार पडली.
आमदार राहुल कुल यांनी विकासकामांबाबत मुद्दे उपस्थित केले
या बैठकीमध्ये दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विकास कामांबाबत मुद्दे उपस्थित केले. (Mla Rahul Kul News) यावेळी जिल्हा नियोजन समितीची सर्व सदस्य, लोकप्रतिनिधी यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पुणे शहरातील अतिरिक्त पाणी वापरामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना खडकवासला धरणातील फक्त ३३% पाणी अर्वतने देण्यासाठी मिळत असून, अर्वतने टेल टू हेड पद्धतीने देण्यात यावे. मुळा – मुठा, भीमा, इंद्रायणी व पवना नदीत सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे वाढलेली जलपर्णी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने काढण्यासाठी तातडीने उपयोजना कराव्यात.(Mla Rahul Kul News)
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या परवानग्या घेऊन केमिकलच्या सहाय्याने देखील जलपर्णी काढणे शक्य असून याबाबत पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कार्यवाही करण्यात यावी.(Mla Rahul Kul News)
ग्रामीण मार्ग निधी देताना लोकसंख्याची अट शिथिल करण्यात आली आहे. परंतु आराखड्यात नसणारे रस्ते दुरुस्त करण्यासाठी निधी मिळत नसल्याने दौंड तालुक्यातील रस्ते विकास आराखड्यात घेण्याचा प्रस्ताव अनेक दिवसांपासून प्रलंबित असून त्यांना मान्यता देऊन निधीची तरतूद करण्यात यावी.(Mla Rahul Kul News) दरम्यान, रस्त्यांची कामे करत असताना वन विभागाकडून कामे अडवली जात असून कामे करत असलेल्या यंत्रणा जप्त केल्या जात असल्याने कामे रखडली आहेत वन विभागाच्या हद्दीतील कामे करण्यासाठी परवानगी देण्यासाठी प्रक्रिया सुरळीत करण्यात यावी. शिवपांदण रस्त्यासाठी नियोजन समितीकडून निधी देण्यात यावा.(Mla Rahul Kul News)
जलजीवन मिशनची कामे करत असताना गंभीर चुका झालेल्या असून याकडे लक्ष द्यावे. या सर्व योजनांचा पालकमंत्री स्तरावर फेर आढावा घ्यावा अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली.(Mla Rahul Kul News)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Rahul Kul | दौंड तालुक्यातील निवडणुका भाजप पूर्ण ताकदीने लढणार – आमदार राहुल कुल