राहुलकुमार अवचट
यवत : सालाबादाप्रमाणे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मी माता यात्रेनिमित्त नियोजन बैठक आज श्री काळभैरवनाथ मंदिर, यवत येथे संपन्न झाली.
श्री काळभैरवनाथ व श्री महालक्ष्मी माता यात्रा व पालखी उत्सवानिमित्ताने श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने रविवार दिनांक ०५ व ०६ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या यात्रा व पालखीचे नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आली होते.
गेली २ वर्ष करोना महामारीमुळे यात्रा झाली नसल्याने यावर्षी मोठ्या उत्साहात यात्रा संपन्न होणार असुन, यावेळी यात्रा व पालखीच्या नियोजनासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी सरपंच समीर दोरगे, माजी उपसरपंच व यात्रा कमिटीचे सदानंद दोरगे, नानासाहेब दोरगे, शंकर दिनकर दोरगे, कैलास दोरगे, सतिश दोरगे , गणेश दोरगे,दत्तात्रय दोरगे यांसह गणेश कदम, कुंडलीक खुटवड, चंद्रकांत दोरगे, अशोक दोरगे , पंडीत दोरगे, दिलीप दोरगे, रमेश जैन, पापाभाई तांबोळी, बाळासाहेब सापळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.