पुणे : तडीपार आदेशाचा भंग करून वडारवाडी परिसरात बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पोलिसांनी रविवारी (दि. १३) अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली. अजय चंद्रकांत विटकर (वय २३, रा. जुनी वडारवाडी, शिवाजीनगर) हे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहेत. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे. यासंदर्भात पोलीस हवालदार बाबासाहेब दांगडे यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
गुंड अजय विटकर व त्याच्या साथीदारांची टोळी वडारवाडी परिसरात सक्रिय आहे. विटकरला गेल्या वर्षी तडीपार केले होते. त्या आदेशाचा भंग करून तो वडारवाडी परिसरात वावरत असल्याची माहिती चतुःशृंगी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.