गणेश नारंग
Pimpri News : पिंपरी : मागील ४ दिवसांपासून पवना धरणासह मावळात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता पवना धरणातील पाणीसाठ्यात आता तब्बल ५१.३४ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडकर व मावळवासीयांची आता पाण्याची काळजी मिटली आहे.
पवना धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ
मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा केला जातो. मागील चार वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरवासीयांना एक दिवसा-आड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत होते. त्यातच जुन महिना संपला तरी पावसाचे आगमन झाले नव्हते. त्यामुळे पाण्याचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली होती. (Pimpri News) पावसाची चिन्हे दिसत नसल्याने पाणीकपातीमध्ये आणखी वाढ करण्याचे संकेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने दिले होते.
मात्र आता त्याची आवश्यकता पडेल असे वाटत नाही,कारण पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून. धरणात ५१.३४ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. (Pimpri News) मागील चार दिवसात धरणातील पाणीसाठ्यात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुढं देखील पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला तर लवकरच धरण १००% भरेल अशी आशा नागरिकांना आहे.जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पावसाने आठ दिवस विश्रांती घेतली होती. सोमवारपासून पुन्हा पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. पवना धरण क्षेत्रात चार दिवस पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली दिसून येत आहे.
दरम्यान, आज धरणात एकूण ५१.३४ टक्के इतका पाणीसाठा असून धरण अर्धे भरले आहे. (Pimpri News) तर, १ जूनपासून आजपर्यंत १११० मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभरात ४० मिली मीटर पावसाची नोंद झाली असून पुढं पाऊस आजुन जोर धरेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.