Pimpri News : पुणे : विसर्जन मिरवणुकीवेळी ढोल-ताशांचा आवाज ऐकताच अनेकांची पावलं थिरकतात. बाप्पांच्या विसर्जन मिरवणूकीत मनसोक्त नाचण्याची मजाही काही औरच असते. आता मिरवणुकीत नाचायला आवडणाऱ्या हौशी कलाकरांसाठी भोसरीकरांनी एक भन्नाट स्किम आणली आहे. भोसरीतील एक मंडळ शहरात गणपती विसर्जनात नाचू इच्छिणाऱ्यांची जमवाजमव करत आहे. यासंबंधी एक जाहिरात नुकतीच मंडळाने प्रसिद्ध केली आहे, जी सोशल मीडियावरही चांगलीच व्हायरल होत आहे. ‘मिरवणुकीत डान्स करण्यासाठी अर्जंट माणसं हवी’ अशी ही जाहिरात आहे. तुम्हालाही तुमचा नागीण डान्स दाखवून पैसे कमवायचे असतील, तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
सोशल मीडियावर चर्चा
केवळ एक दिवस बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत डान्स करणारे हवे, अशी जाहिरात पुण्यातील भोसरीतून प्रसिद्ध झाली आहे. २७ सप्टेंबर रोजी भोसरीत बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. यासाठी मिरवणुकीत नाचणाऱ्या केवळ १०० मुला-मुलींची गरज आहे. (Pimpri News) प्रत्येकाला ३०० रुपये मिळणार आहेत. या संधीचा लाभ घ्यायच असल्यास जाहिरातीत दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. या जाहिरातीवर नेटकरी गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत. लोकांना प्रश्न पडलाय, खाण्या-पिण्याची काही सोय केली आहे की नाही?
या जाहिरातीत एक अट देखील घातली आहे आणि ती म्हणजे, बाप्पाच्या मिरवणुकीत नाचणारी मुलं-मुली हे १८ ते ३० वयोगटातील असले पाहिजेत. (Pimpri News) तसेच, संध्याकाळी ५ ते रात्री १० या वेळेत डान्स करणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे तुम्हालाही मोबदल्यासह पुणेरी ढोल-ताशांवर नाचायला आवडणार असेल, तर तुम्ही या बाप्पाच्या मंडळाशी संपर्क साधू शकता आणि तुमचं नाव नोंदवू शकता.
ही जाहिरात @PuneriSpeaks या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आली आहे. ही जाहिरात नेमकी कुठल्या वर्तमानपत्रात देण्यात आली होती, याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण ही जाहिरात सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (Pimpri News) नेटकरी त्यावर गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत. कोणी विचारते, ‘जेवण नाश्ता पाण्याची काही सोय आहे का?’ तर कोणी विचारतेय, ‘नाचून नाचून घशाला कोरड पडली तर सोय केली का?’ काही जणांना भलताच प्रश्न पडलाय, ‘नोकरी मिळवण्यासाठी ऑडिशन द्यावी लागेल का?’
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : राजन लाखे यांच्या ‘बकुळगंध’ या ग्रंथाची समीक्षात्मक चर्चा