Pimpri News : पिंपरी चिंचवड : वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन होत नसल्यामुळे शहर आणि परिसरात अपघातांचे प्रमाण वाढीस लागले आहे. चुकीच्या बाजूने गाडी चालवणे, नो एन्ट्रीमध्ये गाडी चालवणे, सिग्नल तोडणे, गर्दी असताना फुटपाथवरून गाडी चालवणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. अपघात टाळण्यासाठी आता पोलिसांनीदेखील कंबर कसली आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास लायसन्स थेट तीन महिन्यांसाठी सस्पेंड केले जाणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हे कडक धोरण राबवले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांचे कडक धोरण
दरम्यान, पोलीस एवढ्यावरच थांबलेले नाहीत. आजपर्यंत पोलिसांनी अशी साडेसहाशेहून अधिक लायसन्स सस्पेंड करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव दिले असून, (Pimpri News) त्यातील १९५ लायसेन्स सस्पेंड झाली आहेत. वाहनचालकांवर कारवाई झाल्यानंतर संबंधित चालकांना लायसन्ससाठी नव्याने प्रक्रिया राबवावी लागणार आहे. लायसन्स न काढता वाहन चालवल्यास, १० हजारांचा दंड आकारला जाणार आहे.
याबाबत बोलताना वाहतूक पोलीस अधिक्षक विठ्ठल कुबडे म्हणाले की, बेशिस्त वाहने चालवणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबली आहे. (v) चालू वर्षात ६६० लायसन्स रद्द करण्याचे प्रस्ताव परिवहन विभागाकडे पाठवले आहेत. त्यापैकी १९४ वाहन परवाने रद्द करण्यात आले आहेत. उर्वरित परवाने देखील लवकरात लवकर रद्द करण्यात येणार आहेत. तर दारू पिऊन वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, इतर नियम तोडल्यास वाहनचालकावर परवाना निलंबित होण्याची कारवाई होऊ शकते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : पिंपरीत आगीत होरपळून मृत्यू झालेल्या त्या चौघांची काश्मीर ट्रिप ठरली अखेरची…!