Pimpri News : पिंपरी : सध्या घरोघरी बाप्पांचे आगमन झाले आहे. गणरायाच्या स्वागतासाठी मला साडी नेसव, असा हट्ट त्या १३ वर्षांच्या मुलीने सकाळी सकाळीच आईकडे धरला… मात्र, घरातील कामे बाकी असल्याने आईने साडी नेसवायला नकार दिला. याचा राग अनावर झाल्याने मुलीने ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी किवळे येथील दत्तनगर येथे घडली.
दत्तनगर, किवळे येथील घटना
या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रधान कुटुंबीयांच्या घरात ही घटना घडली आहे. प्रधान कुटुंबाचा बाप्पा विराजमान झाल्यानंतर बाप्पाचे नटून-थटून स्वागत करण्याची मुलीची इच्छा होती. मुलीसह तिची मोठी बहीण आणि लहान भाऊ असे तिघेजण सकाळपासूनच तयारी करीत होते. सकाळीच तिने आईकडे एक विशिष्ट प्रकारची साडी नेसण्याचा हट्ट धरला होता. (Pimpri News) मात्र, सकाळी कामाची गडबड असल्याने तिच्या म्हणण्याकडे आईचे दुर्लक्ष झाले. यामुळे ती नाराज झाली.
दरम्यान, प्रधानांच्या घरच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी दुपारी या मुलीची मावशी आणि काका घरी आले होते. त्या वेळीही तिने पुन्हा आईकडे साडी नेसवण्याच्या आग्रह धरला. आई-वडिलांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुलगी नाराज झाली. ती तडक बाथरूममध्ये गेली. (Pimpri News) बराच वेळ ती बाहेर न आल्याने तिच्या मोठ्या बहिणीने बाथरूमचे दार ठोठावले. मात्र, आतून प्रतिसाद आला नाही. त्यामुळे तिने बाहेर जाऊन खिडकीतून डोकावून पाहिले असता, ती लटकलेल्या अवस्थेत दिसली. त्यानंतर कुटुंबीयांनी बाथरूमचा दरवाजा तोडून तिला खाली उतरवले आणि रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वी तिचा मृत्यू झाला होता.
या घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत. मुलीच्या अचानक जाण्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : वाल्हेकरवाडीत ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग ; एक कोटीचे नुकसान..