pimpri News : पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश गजानन अरणकल्ले यांना मल्लखांब या क्रीडा प्रकारासाठी सन २०२०-२१ या वर्षीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याचे वितरण बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे झाले. या मानाच्या पुरस्कारामुळे पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलाची मान उंचावली आहे.
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलाची मान उंचावली!
अरणकल्ले हे मुळचे पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेत झाले. तेथेच त्यांना मल्लखांब खेळण्याची आवड लागली. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी पुण्यात गेले. (pimpri News ) तेथे त्यांनी उत्तम प्रकारे सराव केला. दरम्यान, जिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेत त्यांनी अनेक बक्षिसे मिळवली. अरणकल्ले हे सध्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात नेमणुकीस आहेत.
२०१४ साली मल्लखांब या खेळ कोट्यातून अरणकल्ले सातारा पोलीस दलात रुजू झाले. येथे चार वर्षे काम केल्यानंतर २०१८ साली त्यांची पिंपरी-चिंचवड शहरात बदली झाली. त्यानंतर पुढील चार वर्ष त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस दलाकडून राष्ट्रीय स्पर्धांना गवसणी घातली. (pimpri News ) सातारा पोलीस दलात असताना त्यांनी २०१७ साली मध्य प्रदेश मधील उज्जैन येथे झालेल्या ३३ व्या राष्ट्रीय वरिष्ठ पुरुष मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धेत सांघिक सुवर्ण पदक तसेच पोल मल्लखांब प्रकारात कांस्य पदक मिळवले. सन २०२२ मध्ये उज्जैन येथे झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेत सांघिक सुवर्ण पदक मिळवले.
सन २०१८ मध्ये फोंडा गोवा येथे झालेल्या ३५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेत सांघिक सुवर्ण पदक आणि टांगता मल्लखांब प्रकारात देखील सुवर्ण पदक पटकावले. (pimpri News ) ऋषिकेश अरणकल्ले यांना सन २०२१ चा मल्लखांब या क्रीडा प्रकारात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अरणकल्ले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : पिंपरीत आगीत होरपळून मृत्यू झालेल्या त्या चौघांची काश्मीर ट्रिप ठरली अखेरची…!