Pimpri News : पिंपरी : जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे पडसदार राज्यभरात उमटताना दिसत आहेत. आंदोलकांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी मावळ तालुक्यात बंद पाळण्यात आला आहे. व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला आहे.
कडकडीत बंदला व्यावसायिकांचा प्रतिसाद
जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले होते. उपोषणादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर आणि नागरिकांवर लाठीमार केला. या घटनेनंतर महाराष्ट्रात विविध ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. (Pimpri News) पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ याठिकाणी देखील कडकडीत बंद पाळण्यात आला असून, अत्यावश्यक सेवा आणि शाळा कॉलेज वगळता सर्व बंद असल्याचे निदर्शनास आले.
पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या लोणावळ्यात मराठा समाज रस्त्यावर उतरला. या वेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Pimpri News) लोणावळ्यासह मावळात देखील कडकडीत बंद पाळण्यात आला.
वडगाव, तळेगाव दाभाडे, कामशेतमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सकाळपासून सर्व दुकाने बंद आहेत. (Pimpri News) शांततेच्या मार्गाने बंद पाळण्यात येत आहे. वैद्यकीय सेवा बंदमधून वगळण्यात आल्या आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
pimpri News : इंदापुरच्या ऋषिकेश अरणकल्ले यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रदान