Pimpri News : पिंपरी, (पुणे) : अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, दिघी पोलिसांनी तरुणाचा माग काढीत मुलीची मोठ्या शिताफीने सुटका केली. न्यायालयाच्या आदेशाने संबंधित तरुणाची रवानगी कारागृहात करण्यात आली. मात्र, ‘माझ्या प्रियकराला तुरुंगाबाहेर काढत नाहीत, तोपर्यंत मी घरीच परतणार नाही, अशा आशयाची चिठ्ठी लिहून मुलीने घर सोडल्याने पालक अचंबित झाले. (I won’t come home until I get my boyfriend out of jail; The police and relatives are shocked by the stubbornness of this minor girl.)
दिघी परिसरातील घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतरा वर्षांच्या प्रियाचे दिघी परिसरात राहणाऱ्या बावीस वर्षीय उमेशशी (दोघांचीही नावे बदलली आहेत) प्रेमसंबंध होते. दरम्यान, ३० मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास प्रिया उमेशसोबत घरातून पळून गेली. (Pimpri News) प्रियाच्या आईने सगळीकडे शोधाशोध केल्यानंतर दिघी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मच्छिद्र पंडित यांनी मुलीच्या शोधात पथके रवाना करीत तरुणाचा माग काढला.
प्रियाची सुटका करीत तिला पालकांच्या स्वाधीन केले.
दरम्यान प्रियाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी उमेशवर अपहरणासह बाललैंगिक अत्याचार (पॉस्को) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यानुसार न्यायालयाने उमेशची रवानगी कारागृहात करण्याचे आदेश दिले. (Pimpri News) उमेश तुरुंगात गेल्याचे समजताच प्रिया रात्रंदिवस रडू लागली पालक समजूत घालीत असताना देखील तिच्या बालमनावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही
दरम्यान, सोमवारी (ता. ०५) प्रियाने ‘माझ्या प्रियकराला तुरंगाबाहेर काढत नाहीत, तोपर्यंत मी घरी परतणार नाही, अशी चिठ्ठी लिहून घरातून पळ काढला. त्यामुळे प्रियाचे पालक आणि पोलिसही हतबल झाल्याचे चित्र आहे.
प्रियाने पालकांना लिहिलेली चिठ्ठी
“मला तुमच्यासारख्या खोट्या लोकांसोबत राहायचे नाही. तुम्ही जे उमेशवर आरोप केले आहेत. ते मीच त्याला करायला भाग पाडले होते. त्याला उमेश जबाबदार नाही, त्याने मला घरी नेले नाही किंवा त्याने मला बोलावले नाही. मी स्वतः त्याचेकडे गेले आणि तुम्ही त्याला मुद्दाम लटकवले आहे.(Pimpri News) तुम्ही त्याला त्याचे आईजवळ जोपर्यंत आणून सोडत नाही, तोपर्यंत मी घरी येत नाही. तसेच, मला काही बरे वाईट झाले तर त्याला मम्मी आणि पप्पा जबाबदार असतील. मी योग्य ठिकाणी राहील माझी काळजी करायची गरज नाही, मला शोधूही नका..!”
याबाबत दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित म्हणाले, “सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी प्रियकरासोबत पळून गेली होती. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. (Pimpri News) दरम्यान, आरोपीची रवानगी कारागृहात केली आहे. या गुन्ह्याचा तपास सुरु असतानाच मुलीने चिठ्ठी लिहून पुन्हा घरातून पळ काढला आहे. त्यामुळे दुसरा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीचा शोध सुरु आहे.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : भोसरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकास अटक
Pimpri News : वाकडमध्ये पूर्ववैमनस्यातून दोघांना टोळक्याकडून कोयता व सिमेंटच्या गट्टूने मारहाण
Pimpri News : धक्कादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये दिराकडून वहिनीवर अत्याचार