पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडील पाणीपुरवठा विभागाच्या अशुद्ध जल उपसा केंद्र, रावेत आणि पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेंतर्गत यंत्रणेची आवश्यक देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. या पार्शवभूमीवर शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद ठेवण्यात येणार आहे. रावेत येथील जल उपसा केंद्र गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा दिनांक १८ जानेवारीचा सायंकाळी होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा अनियमित आणि कमी दाबाने होणार आहे.. नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.