पुणे : पिंपरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक (PSI) नंदकिशोर पतंगे (वय- ३१) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवारी (ता. २१) सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले आहे.
पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर पतंगे हे पिंपरी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. सोमवारी (ता. १९) भोसरी येथील राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यांना तात्काळ भोसरी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.