पुणे : यमुनानगर मधील ‘दि हॅपी फीट प्री स्कूल’चे वार्षिक स्नेहसंमेलन प्रसिद्ध ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या परिसरात असलेल्या मनोहर वाढोकर या सभागृहात पार पडले. छोट्या मुली, मुलांनी आपली कला साभिनय सादर केली. यामध्ये ४४ मुली, मुलांनी सहभाग घेतला होता.
संस्थेला यावर्षी पाच वर्षे पूर्ण झाली. तर १७० हून अधिक मुले पास होऊन पुढील शिक्षणासाठी मोठ्या शाळांमध्ये गेली. वर्षभरात शाळेत स्पोर्ट्स डे ,ग्रँड पेरेंट्स डे ,फॅन्सी ड्रेस, फन फेअर ,ॲन्यूअल गॅदरिंग, कलर डेज, फील्ड विजिट, पिकनिक आणि सर्व सण उत्साहाने साजरे केले जातात.
मुलांच्या नृत्याचे संचलन विराट व अमृता वाईरकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम संचालिका मुख्याध्यापिका पूजा शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. शाळेच्या शिक्षिका आबा जोशी, दिपाली मोरे, रोहिणी भालेराव, श्रीदेवी दीदी व अश्विनी वांगणे दीदी यांचे विशेष कौतुक पालकांनी केले.
दरम्यान, आलाप संगीत विद्यालय आणि कलांगण कथ्थक क्लासच्या संचालिका अश्विनी तळेगावकर व प्रज्ञा शिंदे यांच्या विद्यार्थिनींनी सुद्धा आपली कला सादर केली. सर्व पालकांनी, आजी,आजोबांनी मुलांचे कौतुक करत सहभाग घेऊन मुलांचे मनोधैर्य वाढविले व कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला. या स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन अंकिता वारियर यांनी केले .