पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील क्रिएटिव्ह अॅकॅडमीच्या संचालकांनी एका विद्यार्थीनीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडल्कीस आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यावरून नौशाद अहमद शेख याला अटक कऱण्यात आली आहे. पोलीस याचा अधिक तापास करत आहेत.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील रावेत कॉर्नर येथे नौशाद अहमद शेख क्रिएटिव्ह अॅकेडमी ही निवासी शाळा चालवत आहे. २०२१ मध्ये पीडित मुलीच्या वडिलांनी तिला नववीमध्ये निवासी शाळेत प्रवेश घेऊन दिला होता. त्यासाठी पीडितेच्या वडिलांनी २ लाख २६ हजार रुपये त्याला दिले होते. मुलींच्या हॉस्टेलच्या पहिल्याच मजल्यावर नौशाद शेख राहात आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची असताना शेख याने मुलीवर अत्याचार केले. २०२२ मध्ये फ्लॅटवर बोलवून पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने शेख याला विरोध केला.
यावेळी त्याने तुझे बाकीच्या मुलांसोबत संबंध असल्याचे तुझ्या घरच्यांना सांगेन, अशी धमकी शेख याने दिली. त्याने मुलीला धमकावून वारंवार अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. अकॅडमीतील १२ वीच्या मुलीच्या समोरही अश्लील शेरेबाजी केली. याच अॅकेडमीतीली एका माजी विद्यार्थीनीनेही पीडितेला शेख याच्यासोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.
दोन वर्ष शेख मुलीसोबत अत्याचार करत होता. घाबरलेली मुलगी निवासी शाळेत राहण्यास तयार नव्हती. त्यामुळे आई वडिलांनी तिला गावाकडे नेले, ११ जानेवारी २०२४ रोजी मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रकार आई वडिलांना सांगितला. त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन शेख याला अटक केली आहे.