लोणावळा, (पुणे) : पुण्यातील लोणावळा परिसरात पॉर्न व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीचा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. लोणवळ्यातील आर्णव व्हील या बंगल्यावर अश्लील चित्रफित बनविण्याचा प्रकार सुरू असल्याचं कळताच लोणावळा पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत 15 जणांसह त्यांना बंगला भाड्याने देणाऱ्या ३ जणांवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात 29 मार्च रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी पॉर्न शूट करण्यासाठी लागणारा कॅमेरा आणि इतर साहित्य जप्त केलं आहे. त्यांच्याकडून शूट करण्यात आलेले काही पॉर्न व्हिडिओ ही जप्त केले आहेत. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी13 जणांना अटक केली आहे. भारतातील वेगवेगळ्या राज्यातून हे सर्व तरुण लोणावळ्यात एकत्र आले होते.
भारतात पॉर्न व्हिडिओ बनवणे कायद्याने गुन्हा आहे. असे व्हिडिओ बनवणे बंदी आहे. असं असताना देखील ही १५ जणांची टोळी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमताने बिनधास्त अश्लील चित्रफित तयार करत होती. या सर्व आरोपीविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्णु मुन्नासाहब साओ (वय-30, रा.16 परगना, कोलकत्ता), जावेद हबीबुल्ला खान (वय-35, रा. आहरा उमरी, जि. बस्ती, उत्तरप्रदेश), अलका राज के राजन (वय 23, रा. आरपी, साउथ वेस्ट दिल्ली), नेहा सोमपाल वर्मा (वय 38, रा. गणेशपुरी, मुजफानगर, उत्तरप्रदेश), रिया वासु गुप्ता (वय 21, रा.लक्ष्मीनगर, शखरपुर, दिल्ली), बुध्दसेन बरदानीलाल श्रीवास (वय-29, रा. महाकाली कॉलनी, चंद्रपुर), समीर मेहताब आलम (वय 26, रा. अमरोहा, राईड मॉक्सी, उत्तरप्रदेश), अनुप मिथीलेष चौबे (वय 29, रा. काशीबाई चाळ कांदिवली ईस्ट, मुंबई), रामकुमार श्रीभगवान यादव (वय 21, रा. रोनक सिटी, शाम कॉलनी, हरियाणा), विना भारत पोवळे (वय 32, रा. केंगार चाळ, खोपट, ठाणे), मैनाज जाहीद हुसेन खान (वय 28, रा. सनसिटी, नालासोपारा वेस्ट, जि. पालघर), राहुल सुरेश नेवरेकर (वय 38, रा. मोहनचाळ, वागळे इस्टेट, ठाणे), अनिकेत पवन शर्मा (वय 19, व्यवसाय मेकअप आर्टीस्ट, रा. रूद्राक्ष रेसिडेन्सी, पलसाना, सुरत, राज्य गुजरात), वंशज सचीन वर्मा (वय 21, रा. डेहराखास, डेहराडुन), मनीश हिरामण चौधरी (वय 20, रा. शास्त्रीनगर, हरीयाणा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.