पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरातील एका शाळेत तीन विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेतील ॲडमिन ऑफिसमध्ये काम करत असणाऱ्या एका नराधम कर्मचाऱ्याने शाळेतील तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरून नराधम सरफराज मन्सूर शेख या 32 वर्षाच्या शाळेतील कर्मचाऱ्यावर दापोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधी दरम्यान सरफराज मन्सूर शेख या शाळेच्या ॲडमिन ऑफिसमध्ये काम करतो. शाळेतील तीन विद्यार्थिनींना वेगवेगळ्या दिवशी बॅड टच करून विनयभंग केल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर न थांबता आरोपीने तीन विद्यार्थिनींपैंकी एका विद्यार्थिनीचा घरापर्यंत पाठलाग देखील केला असल्याचे आता उघड झाले आहे. विद्यार्थिनींनी हा सर्व प्रकार आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकाला सांगितल्यानंतर शाळेतील मुख्याध्यपकाच्या तक्रारीवरून दापोडी पोलिसांनी तातडीने सरफराज मन्सूर शेख विरोधात गुन्हा दाखल केला आहे