पिंपरी, (पुणे) : पैसे कसे ढापायचे हे शरद पवार कुटुंब जगाला शिकवू शकतं. कोविड काळात त्यांचा वसुलीचा धंदा सुरू होता. पवार कुटुंबातील प्रतापराव पवार यांच्या ‘न्यू स्टार इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचा १२ वर्षांत एका दमडीचाही व्यवसाय झाला नाही. अचानक मार्च २०२१ मध्ये ‘सिरम इन्स्टिट्यूट’च्या बँक खात्यातून ४३५ कोटी शरद पवार परिवारातील प्रतापराव पवार यांच्या कंपनीत आले आहेत.
हे सिरम कडून आलेलं कमिशन तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित करत दिल्लीला जाऊन याबाबत पाठपुरावा करणार आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले. त्यांनी पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी सवांद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच त्यांनी निगडीतील पीएमआरडीमध्ये रीतसर अर्ज केला आहे. या प्रकरणी दिल्लीला जाऊन पाठपुरावा करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.