संतोष पवार
पिंपरी : पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील भोसरी शहर शिवसेना विधानसभा प्रमुखपदी संभाजीराव शिरसाट यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. बुधवार ७ ऑगस्ट रोजी चाकण येथे शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर शिवसेना संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
यावेळी शिवसेना सचिव तथा माजी आमदार किरण पावसकर, शिवसेना पुणे – सोलापूर संपर्कप्रमुख संजय माशेलकर, शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद, पुणे महिला संपर्कप्रमुख गीतांजली डोणे, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, शिवसेना पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे आदींसह सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
यापूर्वी शिरसाट यांनी शिवसेनाप्रणीत शिक्षक सेनेच्या पुणे विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळत शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न -मागण्यांचा शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. यामध्ये विना अनुदानित शाळांच्या समस्या, संच मान्यता, पायाभूत पदांचा प्रश्न, अनुकंपा तत्त्वांवरील नियुक्ती आदींसह विविध प्रश्न शासन दरबारी मांडून संघटनेच्या माध्यमातून ते सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय शिवसेनापक्ष आणि शिक्षक क्रांती संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी -शिक्षक – शिक्षकेत्तरांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.
शिवसेनापक्षाने दिलेली खेड -भोसरी विधानसभा शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळत असताना पक्षसंघटन करीत पक्षवाढीचे काम सक्षमपणे केले आहे. पक्षनिष्ठा व केलेले कार्य लक्षात घेता पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली भोसरी शहर शिवसेना विधानसभा प्रमुखपदाची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळून पक्षविचार आणि पक्षसंघटन मजबुतीसाठी प्रयत्न करून शासनाच्या सर्व विकास योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे काम प्रामाणिकपणे केले जाईल, अशी माहिती संभाजीराव शिरसाट यांनी पदनियुक्तीनंतर पुणे प्राईम प्रतिनिधीशी बोलताना दिली.